आमच्या विषयी

नाशिकच्या सार्वजनिक वाहतुकीच्या गरजा भागिवण्यासाठी, नाशिक महानगरपालिकेने महासभेच्या ठराव क्र. ९१ दि. १९/०९/२०१८ नुसार विशेष कंपनी स्थापन करून शहर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी सिटीलिंक बससेवेच्या माध्यमातून नाशिककरांना एक सुरक्षित, शाश्वत, कार्यक्षम, विश्वासार्ह, प्रदुषण मुक्त, सुलभ वाहतुक सेवा पुरविण्यास कटीबध्द आहे. त्याव्दारे शहराच्या वर्तमान व भविष्यातील वाहतुकीच्या आवश्यकता पुर्ण करण्याचे ध्येय आहे.

सुरुवातीला २५० बसेस रस्त्यावर धावतील. त्या नंतर प्रत्येक वर्षी मागणीनुसार बसेसच्या फेऱ्या व संख्या वाढिवण्यात येतील. लांब आणि महत्वाच्या मार्गांवर वातानुकूलित विद्युत बसेस उपलब्ध करून दिल्या जातील.

आई. टी. एम. स. तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना बसचे वेळापत्रक, मार्गाचे कि. मी. आणि प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची माहिती तसेच पी. आई. एस (public information system) डिस्प्ले, मोबाईल अँप, आणि वेबसाइट मार्फत बसेसचे आगमन आणि निर्गमन वेळेची माहिती तात्काळ उपलब्ध होईल. स्मार्ट कार्ड द्वारे तिकीट आणि पास खरेदी, बस मध्ये सी.सी.टी.वी कॅमेरा द्वारे निगराणी, बस मध्ये सध्याचा आणि पुढचा बस थांब्याची घोषणा अश्या विविध प्रकारच्या सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आमच्याशी संपर्क साधा

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड

परिवहन भवन,

गोल्फ क्लब मैदान, त्र्यंबक रोड,

नाशिक - ४२२००२

citilinc@nmc.gov.in

७७०९९७३३०७